जळगाव प्रतिनिधी- पोलीस आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. आपल्या वर्दीचा सर्वसामान्यांना आधार तर गुन्हेगारांना धाक वाटावा असे काम करून व सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे ! असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या पोलिसांचा सत्कारा प्रसंगी बोलत होते.
मुंबई नायगाव येथे नव्याने पोलीस दलात भरती झालेले म्हसावद येथील सागर नाना शिवदे, गायत्री मधुकर धनगर, जळगाव येथील अक्षय (गोलू) ठाकरे,प्रदीप राठोड, मंगेश राठोड या नव – नियुक्त पोलिसांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन म्हसवड रामदेव बाबा मंदिर सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नगरसेवक गणेश सोनवणे, जगदीश राठोड, बी.बी. धाडी, रामभाऊ राठोड,माधव राठोड, जगदीश काळे, विष्णू चव्हाण यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी.बी. धाडी सर यांनी केले.