नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपला जबर धक्का बसला आहे. कारण तुर्भे येथील भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिलेले भाजपचे ४ नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश करणार आहेत.
राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांचा समावेश आहे. या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चारही नगरसेवक शिवसेनत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, या चार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हापासूनच हे नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.