यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगरपरिषेच्या माध्यमातून लाखो रूपये खर्च करून नवीन साठवण तलावाची निर्मीती करण्यात आली आहे. या तलावातून शहरात पाणीपुरवठा होत असल्याने नवीन साठवण तलावाच्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देण्यात आले.
यावल नगरपरिषदेच्या माध्यमातुन यावल शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नविन साठवन तलावाची उभारणी करण्यात आले आहे. दरम्यान साठवण तलावाची ताडपत्री निविदाप्रमाणे तळाशी टाकण्यात आलेली नाही. साठवन तलावाचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे शिवसेनेने तक्रार निवेदनात म्हटले आहे. नविन साठवन तलावाची उच्चस्तरिय संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय संबधीत ठेकेदाराचे बिल देण्यात येवु नये, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख गोपाळ चौधरी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष खर्चे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, योगेश पाटील, शिसेनेच्या आदीवासी विभागाचे तालुका प्रमुख हुसैन तडवी, पप्पु जोशी, अजहर खाटीक, विजय पंडीत, पिंटू कुंभार ,युवा सेनेचे सागर देवांग आदी उपस्थित होते.