जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाने महिलांसाठी बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. जळगाव बस आगारात सुद्धा ही महिलांसाठी ही सवलत लागू करण्यात आली आहे. त्या पार्शवभूमीवर शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात प्रवासी महिलांचा विभाग नियंत्रकांकडून गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
एस टी महामंडळाकडून महिलांना 50 टक्के सवलत जाहीर केल्यामुळे पहिल्याच दिवशी गुरुवारी जळगाव बस स्थानकात महिला प्रवाशांची गर्दी वाढली. शासनाने दिलेल्या सवलतीचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून बस स्थानकावरील महिलांच्या सन्मान करण्यात आला. अधिकाऱ्याकडून होत असलेल्या सत्काराने महिला चांगल्याच भारावल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींचा तरुणींचा तसेच बसमध्ये बसलेल्या महिलांचाही विभाग नियंत्रकांच्या हस्तेपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी शासनाच्या या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहनही भगवान जगनोर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सर्व अधिकारी कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.