Home क्राईम नवीन बसस्थानकात बसमध्ये चढतांना महिलेचे दागिने लंपास

नवीन बसस्थानकात बसमध्ये चढतांना महिलेचे दागिने लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढतांना बसमधून महिलेचे १ लाख १२ हजारांचे दागिणे चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्नेहल अजीत तायडे वय ३१ ह्या बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगावात आल्या. यावल येथे जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकातून जळगाव यावल बसमध्ये बसल्या. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना त्यांच्याकडील पर्समध्ये असलेले १ लाख १२ हजारांचे दागिणे आढळून आले नाही. बसस्थानक परिससरात शोध घेतला मात्र दागिणे कुठेच मिळून आले नाही, अखेर बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिणे लांबविल्याची खात्री झाल्यावर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्नेहल तायडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज बंकट हे करीत आहेत.


Protected Content

Play sound