पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने चौकशीचे नाटक रंगवून तुरुंगात डांबले असून याविरोधात आक्रोश करत पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध आणि धिक्कार करण्यात आला. तशा आशयाचे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अतिशय स्पष्टपणे कुणालाही न घाबरता केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा समाचार घेणारे नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास देण्याचा व महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरणाऱ्या केंद्र सरकारची ही दहशत निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळणारे अपयश आणि केंद्रातल्या कारभारामुळे जगभरात होणारी नाचक्की यास नवाब मलिक केंद्राला वारंवार लक्ष्य करणे हीच या अटके मागील खरी कारणे आहेत. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी उचललेले हे दहशत निर्माण करणारे पाऊल आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. दहशत निर्माण करणाऱ्या ईडी चा दुरूपयोग करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. अशा आषयाचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. निवेदन देतेवेळी मा. आ. दिलीप वाघ, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, शेख रसुल शेख उस्मान, मा. नगरसेवक भूषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, अजहर खान, बशीर बागवान, वासुदेव महाजन, प्रकाश पाटील, अॅड. अविनाश सुतार, शालिग्राम मालकर, भगवान मिस्तरी, बाजार समितीचे प्रशासक रणजित पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, युवकांचे शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, उपाध्यक्ष गणेश पाटील, जय सुतार, वाजिद बशीर बागवान, मोहसीन खान, उपस्थित होते.