नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन – प्रकाश आंबेडकर

 

औरंगाबाद : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

कोरोना लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय.

.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. तर काँग्रेसनं संभाजीनगरच्या नावाला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा या मागणीला अँटी मुस्लिम भुमिकेचा वास येत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शहराचं नाव बदलायचं असेल तर लोकांचं मत जाणून घ्या, त्यासाठी मतदान घ्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

‘औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या औरंगाबादकरांना ९ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ते आम्ही २ दिवसांवर आणू, असं आश्वासन आंबेडकरांनी दिलंय.

Protected Content