जामनेर, प्रतिनिधी । शहरात नागरीकांच्या बेफिकीरीपनासमोर अक्षरश: प्रशासनही हतबल झाले आहे. दरम्यान, शहरातील चौकाचौकात कर्तव्यांवर असलेले सर्व पोलिसांना घराबाहेर पडणाऱ्यांकडून ते अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले जात असल्याने पोलीस हतबल झाले होते.
कोरोनाची सायकल ब्रेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. असे असले तरी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी वेळ देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तरीही अनेकजण शहरातून फिरत असल्याचे निदर्शनास आले. अशा टवाळखोरांना पोलिसांनी चोप दिला होता. आज मात्र त्यांनी अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली किराणा, भाजीपाला, पेट्रोलपंपांसमोर मोठ्याप्रमाणावर गर्दी करतांना दिसून आले.
चढ्या भावाने विक्री
जामनेरातील मयुर किराणा या होलसेल किराणा दुकानातून चढ्या भावाने किराणा मालाची विक्री केली जात असल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहिसलदार अरूण शेवाळे यांना दिली. त्यानुसार अरूण शेवाळे यांनी दुकानात जाऊन पक्के बिल देण्याचे आदेश संबंधीत व्यापाऱ्यास दिले.