नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा : पालकमंत्र्यांकडे मागणी

यावल, प्रतिनिधी | यावल नगरपरिषदेतील झालेल्या भ्रष्टाचाराची एस.आय.टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावल शहर शिव सेनेतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, यावल नगर परिषदेत आज पर्यंत झालेल्या विविध विकासात्मक कामात भ्रष्टाचार झालेला असुन झालेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा दाट संशय आहे. यावल शहरात तसेच न.पा विस्तारीत क्षेत्रात झालेल्या पाणी पुरवठाच्या पाईप लाईन कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असुन कामे निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच यावल शहराच्या पाणी पुरवठ्या अतिरिक्त पाणी साठवण तलावात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.सदर तलावाचे काम मंजुर नकाशा व एस्टीमेंट प्रमाणे झालेले नाह.तशेच मजूर क्षेत्रापेक्षा कामी क्षेत्रावर केलेले आहे. एस्टीमेंट नुसार डांबर पाचिंग केलेली नाही त्याच प्रमाणे तलावासाठी वापरण्यात आलेले रबर ताडपत्री निकृष्ट दर्जाचे आहे.तशेच मंजुर जागेवर तलावाचे काम केलेले नाही.हतनूर विभागाकडून मिळवलेल्या जागेवर सदर तलावाचे काम झालेले नाही.तसेच या कामात सुमारे १ कोटी ८० लाख रुपयंचा भ्रष्टाचार झालेचा संशय आहे. तसेच न.पा च्या झालेल्या संपुर्ण विविध कामे निकृष्ट दाचे झाले असुन न.पा.च्या सर्वच कामांची तातडीने एस.आय.टी मार्फत चोकशी करून कामांचे स्पेशल ऑडीट करण्यात यावेव संबधितांवर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे. निवेदनावर उप जिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उप संघटक पप्पू जोशी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, युवा सेना शहरप्रमुख सागर देवांग, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, विभाग प्रमुख सारंग बेहेडे आदी उपस्थित होते.

Protected Content