भडगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी नगरदेवळा रेल्वेगेट वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता मात्र येथील वडगांव बु। ग्रामपंचायत अंर्तगत येत असलेल्या नगरदेवळा रेल्वे गेट येथील वस्तीकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले. या वस्तीमधील ग्रामपंचायत सदस्य पती भगवान शिरसाठ व येथील रहिवाशी ग्रामस्थांच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या अनुषंगाने नगरदेवळा रेल्वे गेट येथील वस्तीमध्ये उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आज २८ रोजी वस्तीमधील तरूण निलकंठ पाथरवट, दिपक वाघ, पिंटु गायकवाड, दिपक गायकवाड, वॉटरमॅन दत्तात्रय ठाकरे यांनी विना मोबदला इलेक्ट्रीक पंपाच्या सहाय्याने निर्जंतूक फवारणी केली.