पाचोरा, प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एम. टी. एस., आय. टी. एस. व एन. एस. एस. ई. या राज्य स्तरावरील विविध प्रज्ञाशोध परिक्षांचा आँनलाईन निकाल जाहीर झाला असून या परिक्षांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या ४ विद्यार्थ्यांचा व पालकांचा नगरदेवळा पत्रकार संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.
सन – २०२१ मध्ये पार पडलेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत आंशिका अमोल पाटील हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. अनिष्का योगेश जाधव ही राज्यस्तरावर तिसरी आली असून, प्रियंका विकास महाजन ही राज्यस्तरावर चौथी व प्रियंका सुनील धनराळे ही राज्यस्तरावर सहावी आली आहे. तसेच तनिष्का योगेश जाधव ही विद्यार्थीनी भडगाव केंद्रस्तरावर प्रथम आली आहे. नगरदेवळा पोलीस स्टेशनच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमात या प्रज्ञावंत मुलींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सल्लागार प्रकाश जगताप, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मिलींद दुसाने, पाचोरा तालुका उपसचिव शैलेंद्र बिरारी, ज्येष्ठ पत्रकार अशोक भावसार, युवा पत्रकार सौरव तोष्णीवाल हे उपस्थित होते. तसेच पोलिस हे. काँ. विनोद पाटील, हे. काँ. नरेंद्र शिंदे, अमोल पाटील, मनोहर पाटील व निवृत्त शिक्षक संतोष महाजन हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब राऊळ यांनी केले व कार्यक्रमास सहकार्य केल्याबद्दल पोलीस स्टेशनचे व विद्यार्थी पालकांचे आभार मानून अशोक भावसार यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.