नंदगावात भरदिवसा चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरफोडून ५० हजारांचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव येथील अज्ञात चोरट्यांने भरदिवसा शेतमजूराचे बंद घरफोडून घरातील सोन्याचे दागीन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शरद भास्कर धनगर (वय-४८) रा. ग्रामपंचयतीसमोर नंदगाव ता.जि.जळगाव हे शेतमजूर असून आपल्या पत्नीसह शेतात जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता ते शेतात जातात. नेहमीप्रमाणे दुसऱ्यांच्या शेतात जाणासाठी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून गेले. अज्ञात चोरट्यांने दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील २५ हजार रूपयांची रोकड आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप असा एकुण ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरू नेला. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे शरद धनगर यांच्या पत्नीच्या लक्षात आले. शनिवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता तालुका पोलीस ठाण्यात गाठले. शरद धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.

Protected Content