धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगांव येथील एका ४६ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खंबा कि. मी. क्रं. ३७३/९ नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने जगदिश ईश्वरीप्रसाद शुक्ला (वय – ४६) रा. देवराम नगर, कमला पार्क, जळगांव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असुन घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. किशोर वाघ हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन बबलु मराठे यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. किशोर वाघ हे करीत आहे.

Protected Content