जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इस्लामचे अंतिम प्रेषितांचा अवमान करून धार्मिक पाहुणे दाखवणाऱ्यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सुन्नी जामा मज्जित संघटनेच्या वतीने शुक्रवार २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हे फक्त मुस्लिमांसाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी वरदान असून ते शांती, समता, बंधुभावाचे प्रेम, अनुपम, अद्वितीय असे प्रतीक आहे. असे असतांना सुद्धा मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका चित्रपटाच्या विरोधात प्रदर्शनात दरम्यान काही गावगुंड प्रवृत्तीच्या जातीयवादी लोकांनी अंतिम प्रेषितांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करून अवमान केल्याच्या घटना घडली आहे. यामुळे समस्त मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. इस्लाम व प्रेषितांनी तर चौदाशे वर्षांपूर्वीच दारू, अश्लिल नृत्य वगैरे या गोष्टींना विरोध केला असून या गोष्टी सर्व मुस्लिम बांधवांसाठी व्यर्ज आहे. त्यात चित्रपट सुद्धा येतो. या चित्रपटातील नट, नटी व त्यात सामील लोकांचा आणि प्रेषितांचा काय संबंध? तसेच त्यातील एक नट हा मुस्लिम असला म्हणून संपूर्ण मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा काय संबंध ! असा देखील सवाल देखील मुस्लिम बांधवांनी केला आहे. आक्षेपार्ह घोषणा देऊन धार्मिक भावना दुखावणाऱ्यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील सुन्नी जामा मश्जिद संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी सय्यद आयन अली नियाज अली, अहमद खान युसुफ खान, फिरोज शेख इकबाल शेख, शेख अहमद खान यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.