Home Cities जळगाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास मुकपद यात्रा शांततेत

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास मुकपद यात्रा शांततेत


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास मुकपद यात्रा मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता महाराणा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अनुषंगाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्त जळगाव शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मुकपद यात्रा काढण्यात आली. अतिशय शिस्तपध्दतीने शांतते ही पदयाप काढण्यात आली. जवळपासून एक किलोमिटरपर्यंत ही यात्रा होती. ही रॅली महाराण प्रताप पुतळा येथून सुरूवात करून आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र्य चौक, नवीन बसस्थानक, पोलीस मुख्यालय येथून नेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात येवून तिथेच समारोप करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound