जळगाव प्रतिनिधी । शहरातील लाकुडे पेठ ते शिवाजी नगर दरम्यान रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने धर्मरथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी रस्तावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. याबाबत संघटनेने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
धर्मरथ फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील लाकुड पेठ ते शिवाजी नगर दरम्यान मुख्य चौक या दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे खड्डे पडले आहे. त्यामुळे शहरातील धर्मरथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेत त्वरील सदरील रस्ता दुरूस्त करावा, तसेच पथदिव्यांची सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर संतोष भितांडे, हर्षद मराठो, राजेश महाजन, अजय चोरट, सागर बडगुजर, दिनेश पाटील, सुरेश साबळे, पवन सोनवणे, मंगेश बिऱ्हाडे, शशीकांत बागुल, शिवाजी बाविस्कर, विकास मुदार, गिरीष कंक, विनायक पाटील, प्रतिक बरखडे, सागर अनिल मांढरे, विजय कृष्णा काळे, कैलास शिंदे यांच्यासह आदी सदस्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1112115922516604/