Home आरोग्य धर्मरथ फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण स्मशानभूमीचे करण्यात आले निर्जंतुकीकरण (व्हिडिओ)

धर्मरथ फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण स्मशानभूमीचे करण्यात आले निर्जंतुकीकरण (व्हिडिओ)

0
101

जळगाव, प्रतिनिधी । आज मंगळवार दि. २३ जून रोजी धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने शिवाजीनगर स्मशानभूमी येथे कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक फवारणी मशीनच्या सहाय्याने फवारणी करून स्मशानभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची लागण होऊ नये या दृष्टीकोनातून धर्मरथ फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवाजीनगर स्मशानभूमी येथे निर्जंतुकीकरण मोहीम राबिण्यात आली. याप्रसंगी धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, हिरामण तरटे, निशांत पाटील, प्रकाश मुळीक,विपीन पवार,जितेंद्र गवळी, प्रमोद महांगडे, सागर बडगुजर, तुषार सूर्यवंशी,योगेश कदम आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/586668815557641/


Protected Content

Play sound