जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील मंगलम लॉन मधील एका हॉलमध्ये प्रार्थनासह सत्संगाचे नावाखाली धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भुसावळ रोडवर असलेल्या कालिंका माता मंदिर परिसरातील मंगलम लॉन येथील एका हॉलमध्ये रविवारी २ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील खेडेगावातील काही कुटुंब एकत्रित प्रार्थना व सत्संगाच्या नावाखाली जमा केले होते. दरम्यान खेड्यापाड्यातून आलेल्या हिंदू धर्माच्या लोकांना वेगवेगळी आमिष दाखवत हिंदू धर्माच्या भावना दुखवून धर्मपविर्तन करण्याचा प्रकसार सुरू होता. असा प्रकार सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनांसाठी दाखल झाला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली, यामध्ये प्रार्थनेसह सत्संगाच्या नावाखाली धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी कीर्तनकार योगेश दिलीप कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सीना संतोष पाटील (वय-४१), पवन दीपक सारसर (वय-२५), राजकुमार हरीशंकर यादव (वय-४७) आणि प्रदीप बाजीराव भालेराव (वय-४९) या चौघांनी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना पोलीसांनी चौकशाीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे