धरणगाव प्रतिनिधी । कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून तालुक्यात नव्याने सात रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये धरणगाव शहरातील ६ तर पाळधी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून बरे होण्याची संख्या देखील आता वाढायला लागली आहे. कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेत. त्यात तब्बल शहरात सात रूग्ण आढळून आले असल्याने आरोग्य विभागाची चितां वाढली आहे. धरणगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११८ झाली. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये हेमइंदू नगरातील ५, परिहार नगर १ तसेच पाळधी गावातील एक असे एकुण सात रूग्ण आढळलेत. सदरील परिसर सील करण्यात येत असून आढळून आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.