धरणगाव : विधवा महिलेवर अत्याचार, गर्भपातासाठी जबरदस्ती ; ६ जणांविरुद्ध गुन्हा

 

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विधवा महिलेवर सतत अत्याचार करून तिला पाच महिन्याची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, बलात्कार, मारहाणसह विविध कलमान्वये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या संदर्भात अधिक असे की, पिडीत महिलेला साधारण सहा महिन्यापूर्वी शेतात कामाच्या निमित्ताने बोलावून सुभाष हरी पाटील याने बोलावले होते. त्यावेळी शेतात कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत त्याने तू विधवा आहेस, तुझा सर्व खर्च मी करेल असून सांगून पिडीत महिलेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितला, तर तुझ्या तिघं मुलींना मारून टाकेल अशी धमकी दिली. यानंतर सुभाष पाटील हा सतत शेतात बोलवायचा व इच्छेविरुद्ध शरीर संबंध करायचा, असे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर पिडीत महिलेला दिवस गेलेत. २८ फेब्रुवारीला चांदसर येथील सरकारी दवाखान्यातून परत आल्यानंतर सुभाष पाटील याने आपणास गावाबाहेरील खळ्यात बोलावले. यावेळी त्याची पत्नीसह सुभाष उभा होता. आमची समाजात बदनामी होईल, असे सांगत दोघांनी गर्भपात करण्यासाठी मला सांगितले. परंतू तब्येत खराब असल्यामुळे मी घरी निघून आले. घरी आल्याबरोबर पिडीतेने आपल्या सासूला सर्व हकीगत सांगितली. जळगाव येथील एका रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर पिडीत महिला पाच महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर २ मार्च रोजी सुभाष हरी पाटील व त्याची पत्नीसह इतर नातेवाईक गुलाब हरी पाटील, शांताराम हरी पाटील, बापू शांताराम पाटील,प्रीतेश बाळू पाटील यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात घुसून तुम्ही मुद्दाम गावात आमची बदनामी केली आहे. तुम्ही गावात कसे राहतात असे म्हणत पिडीत महिलेच्या दीर,जेठ, मेहुणे यांच्यासह पिडीत महिलेस मारहाण केली. या संदर्भात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सुभाष हरी पाटील व त्याची पत्नी, नातेवाईक गुलाब हरी पाटील, शांताराम हरी पाटील, बापू शांताराम पाटील,प्रीतेश बाळू पाटील यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि श्री. गायकवाड हे करीत आहेत.

Protected Content