धरणगाव ,प्रतिनिधी । येथील नेहरू नगर मधील अंगणवाडी क्र. १३१ येथे राष्ट्रीय पोषण आहार व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्यातर्फे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प (नागरी) जळगाव बीट क्रमांक सहा यांच्या माध्यमातून अंगणवाडी क्रमांक १३१ येथे राष्ट्रीय पोषण आहार व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. हर्षदा पालीवाल, सेच ग्रामीण आरोग्य सहाय्यक श्री. भदाणे, आरोग्य सेवक आर. के. देशमुख, नेहरू नगर परिसरातील नगरसेविका मंदा धनगर, जितेंद्र धनगर, माजी नगरसेवक भीमराव धनगर आदी उपस्थित होते. पर्यवेक्षिकाप्रवीणा तडवी उपस्थित होत्या.