धरणगाव प्रतिनिधी। जागतिक एड्स दिना निमित्त मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी या उद्देशाने येथील ग्रामीण रुग्णालय विभागतर्फे एनजिओ लिंक वर्कर यांच्या संयुक्त वि्यमाने एड्स जनजागृतीपर , माहिती, मार्गदर्शन, पोस्टर प्रदर्शन व एच.आय.व्ही. तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ करण्यात आले होते.
वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिरीष चौधरी यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक भानुदास विसावे, आयुष विभाग डॉ. तुषार जोगी, डॉ. मोसिन शा., आय.सी. टी.सी. समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे, प्रवीण चव्हाण नर्सिंग स्टॉप इंचार्ज, अमोल सूर्यवंशी, अंजली ठाकुर , आर.टी. महाले, अरूनभाऊ सोनवणे, संदीप महाले सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 104 जणांनी एचआयव्ही तपासणी केली.