Home Cities धरणगाव धरणगाव येथे कोरोनमुक्तांचे कॉग्रेसतर्फे स्वागत

धरणगाव येथे कोरोनमुक्तांचे कॉग्रेसतर्फे स्वागत

0
33

धरणगाव, प्रतिनिधी । येथे कोविड सेंटरमधून जे रुग्ण बरे झाले त्यांचे आज धरणगाव युवक काँग्रेसतर्फे स्वागत करण्यात आले.

धरणगाव येथील कोविड सेंटरमधून बरे झालेल्या रुग्णांचा युवक काँग्रेसतर्फे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच याप्रसंगी धरणगाव नगरीचे लोकनियुक्त निलेश चौधरी यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित प्रांतअधिकारी विनय गोसावी,तहसीलदार नितीनकुमार देवरे, निवासी नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, युवक काँग्रेसचे चंदन पाटील, प्रा. परिहार,बंटी पवार, विकास लंबोळे, रातीलाल चौधरी, राजेंद्र न्हाळदे, दीपक जाधव, रामचंद्र महाजन आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound