धरणगाव प्रतिनिधी । शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहाराचे धान्य थेट विद्यार्थी अथवा पालकांना डिस्टन्सिंगनुसार देण्याचे आदेश आहे. त्यानुसार आज येथील महात्मा फुले हायस्कुलच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यातील लॉकडाऊन सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहाराचे धान्य थेट विद्यार्थी अथवा पालकांना डिस्टन्सिंगनुसार देण्याचे आदेश आहे. १८ ते १९ एप्रिल २०२० रोजी महात्मा फुले हायस्कुलच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर. महाजन, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ भोई, पालकांमधुन संजय मोरावकर यांच्याहस्ते सर्व मुलामुलींना तांदुळ वाटप करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.