धरणगाव प्रतिनिधी । शहरातील अतिक्रमण ग्रस्त टपरी धारकांना कायमस्वरूपी पर्यायी जागा दया ही, मागणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळया जवळ भारतीय जनता पार्टिचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अतिक्रमनात हटविन्यात आलेले दुकानदार जमा झाले आणि पर्यायी जागा दया अशा घोषणा देत संपूर्ण नागरिकांचा मोर्चा नगरपालिकेवर धड़कला आणि मुख्याधिकारींच्या दालना बाहेर ठाण मांडून बसले.
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठनार नाही असे मुख्याधिकारी यांना सांगितले. त्यावेळेस ऍड. संजय महाजन व ऍड.हरिहर पाटील यांनी मुख्याधिकारी यांच्याशी कायदेशीर चर्चा करत गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राजकीय धनदाडंगे यांचे अतिक्रमण सोडून तुम्ही भेदभाव करीत आहात असा आरोप केला. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी भारतीय जनता पार्टिच्या आंदोलनाची दखल घेत दोनशे ते तिनशे टपरी धारक यांना पर्यायी जागा देण्यात येईल असे तोंडी आश्वासन सर्वासमोर दिले. यावेळी शिरीष आप्पा बयस, ॲड.संजय महाजन, ऍड.व्ही.एस.भोलाने बापू, मधुकर रोकड़े, ऍड.हरिहर पाटिल, कड़ु बयस, दिलीप महाजन, सुनील चौधरी, राजू महाजन, कांतीलाल माळी, टोनी महाजन, कन्हैया रायपुरकर, वासुदेव महाजन, संजय कोठारी, जितु महाजन, किशोर माळी, विक्की महाजन, शुभम चौधरी, डॉ. अशोक कटयारे, प्रथम सूर्यवंशी, किरण वऱ्हाढे आणि सर्व हात गाडी धारक किरकोळ विक्रेते इत्यादि उपस्थित होते.