Home आरोग्य धरणगाव तालुक्यात २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

धरणगाव तालुक्यात २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


धरणगाव, प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्यात एकुण कोरोना बाधित रूग्ण संख्या २८२ वर पोहचली आहे.

आज दिवसभरात धरणगाव तालुक्यात एकुण २२ रूग्ण आढळले आहे. धरणगाव शहरात १३ तर तालुक्यातील बांभोरी येथे ९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेत. धरणगाव शहराती चिंतामन मोरया ४, कासार गल्ली- २, महावीर नगर-१, गुजराथी गल्ली-१, खत्री गल्ली २, हेमाइंदू नगर-१, वाणी गल्ली १ असे १३ रूग्ण आढळून आलेले रूग्ण आढळले आहेत. तर बांभोरी ३, बांभोरी प्र.चा. ६ असे एकुण ९ रूग्ण आढळले आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या २८२ वर पोहचली आहे. यावृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound