धरणगाव, प्रतिनिधी । रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार तालुकात १७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात धरणगाव ७, पाळधी खुर्द्ध ५ यांचा समावेश आहे.
रविवारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात १७ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर ७ जणांमध्ये वाणी गल्ली २ ,गौतम नगर २ , गणेश नगर १, अंगिहोत्री गल्ली २ यांचा समावेश आहे. तसेच पाळधी खुर्द ५, ,वरड १, केल्याने खु १,पिप्रि १, सळवा १,,चोरगाव १ या रुग्णाचा समावेश आहे.. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात लवकरच फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या २५७ इतकी झाली आहे. यातील १९ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोविड सेंटरमध्ये ७६ जण उपचार घेताय. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.