धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात ५ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील २ तर पाळधी खुर्द, नांदेड, कल्याणेहोळ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा ५ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील बडगुजर गल्ली, संजय नगर प्रत्येकी एक रुग्ण तर पाळधी खुर्द, नांदेड, कल्याणेहोळ येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात लवकरच फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या २२७ इतकी झाली आहे. यातील १९ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोविड सेंटरमध्ये ५३ जण उपचार घेताय. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.