धरणगाव प्रतिनिधी । तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसतर्फे स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.
धरणगाव शहरात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजन तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी यांनी केले व व काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे यांच्याहस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, युवक शहराध्यक्ष गौरव चव्हाण योगेश येवले, कल्पेश महाजन, भूषण भागवत, राहुल मराठे, गजानन पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.