धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी धरणगाव पालिका प्रशासनाने विविध उपायोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून भविष्यात दुर्दैवाने रुग्णांची संख्या वाढली तर त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्यात येत आहे. शहराबाहेर असलेल्या महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी या कक्षाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी स्वतः उभे राहत ताबोडतोब या कक्षाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून घेतले.
कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून धरणगाव तालुक्याला लागून असलेल्या अमळनेरात आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची लक्षण असलेल्या तसेच संशयीत रुग्णांसाठी शहरालगत असलेल्या कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साधारण २० बेड आहेत. याठिकाणी सर्व सुविधायुक्त आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे. हा विभाग पुर्णतः स्वतंत्र राहणार आहे. या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा राहणार आहेत. कोरोना रुग्ण वाढल्यास खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. आज मुख्याधिकारी जनार्दन पवार, आरोग्य अधिकारी गिरीश चौधरी यांनी आज या विभागाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नगरपालिकेचे निलेश वाणी,रामकृष्ण महाजन, अण्णा महाजन, सामशोद्दिन शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान,आयसोलेशन कक्षासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष श्री.चौधरी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3836325349772963