धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अहिंसेचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळेस काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेशजी भागवत, नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष भानुदासजी विसावे, नगरसेवक जितू धनगर, संजय निराधार कमिटीचे सदस्य बंटी पवार, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, शिवसेनेचे धीरेंद्र पुरभे, बालू जाधव, विनोद माळी, मेहबूब पठाण, समाधान पाटील तसेच काँग्रेसचे विजय जनकवार, रामचंद्र माळी, राहुल मराठे, योगेश येवले, ज्ञानेश्वर महाजन, किशोर माळी व कार्यकर्ते उपस्थित होते.