धरणगाव, प्रतिनिधी | काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकतेच सर्वधर्मीय एकता संमेलन व सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. त्यात हिंदू-मुस्लीम जैन व बुद्ध धर्माची प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन करण्यात आले व गांधीजींच्या सर्वधर्मीय समभाव व अहिंसेच्या मार्गावर सर्वांनी मार्गक्रमण करू ,अशी शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील, डॉ. मिलिंद दहाडे, प्रा.सम्राट परीहार यांनी गांधीजींच्या कामाची व त्यागाची माहिती सर्वांना दिली. याप्रसंगी हिंदू धर्माची प्रार्थना कीर्तन कार नाना महाराज, जैन धर्मातर्फे मोहनदादा जैन, मुस्लिम धर्मातर्फे मौलाना अजर सैय्यद, बौद्ध धर्मातर्फे गोवर्धन सोनवणे यांनी प्रार्थना कथन केली.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष रतीलाल चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हाळदे, सुरेश भागवत, अरुणाताई कंखरे, चारुशीला पाटील, चंदन पाटील, महेश पवार, गौरव चव्हाण, योगेश येवले, बापू जाधव, जगदीश चव्हाण, रामचंद्र महाजन, नंदा महाजन, बापू परिहार, राजेंद्र ठाकूर, शिवा महाजन, मनोज कंखरे, सुनील बडगुजर, सलीम मिस्त्री, माजीद मण्यार, रामचंद्र पाटील आदींसह सर्वधर्मीय मान्यवर आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.