धरणगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रं.१ मध्ये आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप गुरुवार ३० जुलै रोजी करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीतर्फे यापूर्वी ३० जूनला तसेच में महिन्यात ३० तारखेला कैलास माळी सरांनी स्वखर्चाने गोळ्यांचे वाटप केले होते. आता परत तिसरा डोस प्रत्येक घरी जाऊन वाटप करण्यात आला. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करून मास्क वापराने व काळजी घेण्याचे आवाहन केले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय महाजन, गटनेते कैलास माळी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.