
धरणगाव, प्रतिनिधी । एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी १०० कोटींवर १५ कोटी भारी आहेत, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज त्यांचा पुतळा दहन करत भाजपने निषेध नोंदवला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे पी. सी. आबा पाटील, तालुकाध्यक्ष ऍड संजय महाजन, कमलेश तिवारी, टोनी महाजन, ऍड भोलाने बापु, ऍड हरिहर पाटील, प्रकाश सोनवणे,शेखर पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील, गटनेते कैलास माळी, शरद कंखरे, आर. डी. महाजन, मधुकर रोकडे, ललित येवले, भालचंद्र माळी, कड़ुआप्पा बयस, निर्दोष पाटील, विजय पाटील, नाना पाटील, दिलीप महाजन, कांतीलाल माळी, सुनील चौधरी, कन्हैया रायपुरकर, राजु महाजन, संजय पाटिल, योगेश ठाकरे, दिनेश पाटील, सचिन पाटील, विक्की महाजन, मयूर महाजन, ज्ञानेश्वर महाजन,शुभम चौधरी आदी उपस्थित होते.