धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे श्री गणेश उत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातून रूट मार्च काढण्यात आला.
आज शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी धरणगाव शहरात रूट मार्च काढण्यात आला. या मार्चला पोलीस स्टेशनपासून प्रारंभ करण्यात येवून धरणी चौक – कोर्ट बाजार – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने पुन्हा पोलीस स्टेशन असा काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान, पोलीस, होमगार्ड यांचा समावेश होता. यात रॅपिड ऍक्शन फोर्सचे उप कमांडंट शशिकांत राय, सहा. कमांडट संतोष यादव, पोलीस निरीक्षक जी. एस. झरिया, धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, एपीआय श्री. पाटील, पीएसआय श्री. पवार, श्री. गुंजाळ, श्री. बेलदार आदी सहभागी झाले होते. रूट मार्चमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे अधिकारी व स्थानिक अधिकारी, ९० आरपीएफ जवान, २० अंमलदार, २० होमगार्ड सहभागी झाले होते.