धरणगाव प्रतिनिधी । शहरातील ४ जण कोरोनाने बाधीत असल्याचा अहवाल आज सायंकाळी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार धरणगावात ४ रुग्ण सापडले आहेत. वृत्ताला आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.
धरणगाव येथील कोविड केअर सेंटरने काही जणांचे स्वॅब सँपल पाठविले होते. यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले आहे. यात धरणगाव शहरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात साहिल नगर, मराठे गल्ली, हनुमान नगर, मोठा माळीवाडा परिसरातील रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. वृत्ताला आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत असली तरी संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.