धरणगाव, प्रतिनिधी । रामभाऊ नामदेव महाजन उर्फ साईबाबा रा. लहान माळी वाडा परिसरतील होते. त्यांची कपड्यांची परिधान करण्याची शैली शिर्डीचे साईबाबा सारखी होती, म्हणून त्यांना साईबाबा म्हणून टोपन नावाने ओळखले जात असत.
साईबाबा गेल्या कित्येक वर्षांपासून कोट बाजार या ठिकाणी शिवसेना कार्यालयावर रात्रीचा वेळी वामकुक्षी घ्यायचे. कोट बाजार परीसरातील व्यापारी सुनिल सोनार यांच्या पत्नी खूप त्यांची सेवा करायच्या. बाबांच्या मृत्यूची बातमी त्यांना समजताच त्यांना रडू कोसळले. साईबाबा धरणगावचे असून त्यांना मुले व पत्नी देखील असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या कुटुंबियांचा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व अशोक बोरसे यांना खुप शोधा घेतला. परंतु, त्यांचा ठावठिकाणा मिळून आला नाही. गावात कोणीही नातेवाईक नसल्याने लागलीच शिवसेनेने अंत्यविधी निर्णय घेतला. हि गोष्ट लहान माळी वाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व कडु महाजन यांचा कानावर श्री. वाघ यांनी घातली. त्यांनी सांगितले येथे त्यांच्या कोणताही नातेवाईक नाही तर तुम्ही शिवसेनेकडुन अंत्यविधी करुन टाका. शिवसेना गटनेते विनय भावे हे साई बाबांची गेल्या कित्येक वर्षापासुन ते त्यांना जेवण असो व आर्थिक मदत हे करत होते. त्यांनी सांगितले होते की, मी जेव्हा मरेल तेव्हा मला न जाळता मिठामधे माझा अंत्यसंस्कार करावे असे सांगितले होते, म्हणून तशी अंत्यविधी त्या पद्धतीने करण्यात आली करण्यात आली. मागिल 10-12 दिवसा आधी वयोमानानुसार तब्येत खालावल्याने त्या साई बाबा ला शिवसेना कार्यालय कोट बाजार येथुन मा.गुलाबरावजी वाघ साहेब यांचा आदेशाने सर्व शिवसेने चे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी त्या साई बाबा ला धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे ऍडमिट केले व त्याचावर वैद्यकिय उपचार सुरू होते. पण आज साईबाबा यांचे निधन झाले व त्या साईबाबांचे अंत्यविधीसाठी लागणारा पुर्ण खर्च धरणगाव शिवसेनेतर्फे करण्यात आला. त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी.,शिवसेना गटनेते पप्पु भावे.,यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भगवा परिधान केला. अंत्ययात्रेला नगरसेवक भागवत चौधरी., विलास महाजन., किरण मराठे.,जितू धनगर., शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना विभाग प्रमुख संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, कडु महाजन आदींनी श्रद्धांजली वाहिली.