धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील

 

मुंबई वृत्तसंस्था । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने शोषणाचे आरोप केल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काल धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने शारिरीक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट लिहून याबाबत स्पष्टीकरण दिले असले तरी मात्र या प्रकरणी ते गोत्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी कालच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

या ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, भाजप महिला मोर्चाने आधीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आता आपण सुध्दा त्यांचा राजीनामा मागत आहोत. त्यांना आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले आहे.

Protected Content