धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबीयांचा प्रवास

मुंबई (वृत्तसंस्था) देशव्यापी लॉकडाऊऩ सुरु असतानाच येस बँक, डीएचएफएल अशा घोटाळ्यांमुळे चर्चेत आलेले कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासह वाधवान कुटुंबीयांतील २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

 

या प्रवासाच्या सीबीआय सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसंच गरज भासल्यास सर्व आरोपींना विशेष विमानाने पाठवण्याची सोय करा असेही गृहमंत्रालय राज्य सरकारला सांगू शकते. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. या प्रवासाच्या सीबीआय सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसंच गरज भासल्यास सर्व आरोपींना विशेष विमानाने पाठवण्याची सोय करा असेही गृहमंत्रालय राज्य सरकारला सांगू शकते. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Protected Content