रावेर प्रतिनिधी । रावेर कोरोनाने महसूल विभागात एंट्री केली आहे. विभागातील २९ वर्षीय लिपक तर मुख्य लिपिकाचे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
रावेर महसूल विभागात देखिल जिवघेणा कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून २१ जुलै रोजी शासकिय अहवालात महसूल विभागाचे एक लिपिक कोरोना पॉझीटीव्ह आला आहे तर दुसरे मुख्य लिपिक यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महसूल विभागातील इतर कोणते कर्मचारी व अधिकारी यांच्या संपर्कात आले आहे. तसेच बाहेरील इतर कोणते नागरीक यांच्या संर्पकात आले याचा शोध घेण्याचे अवाहन आरोग्य प्रशासना पुढे आहे. तसेच महसूल विभाच्या इतर व्यक्तीचे देखिल आज स्वॅब घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहेत.