रावेर, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयातील ५२ वर्षीय कर्मचारी कोरोना पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी येथील एक अधिकारी कोरोना पोझिटिव्ह आल्या नंतर या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयातील ५२ वर्षीय कर्मचारी कोरोना पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या कर्मचाऱ्याच्या संपर्कात कोण-कोण आले ? किती पेशंट आले याचा शोध घेण्याचे आव्हान ग्रामीण रुणालय प्रशासना पुढे आहे. येथील रुग्णालयातील इतर सर्व कर्मचा-याच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येणार आहे.