पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर सरस्वती शेडगे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटवर दिली होती. त्यानंतर आता उपमहापौर यांच्यासह सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने राजकीय वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते.