धक्कादायक : धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले !

बारामती (वृत्तसंस्था) वेगेळे राहण्याच्या कारणावरुन सख्ख्या धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. मारुती वसंत भोंडवे (वय ४८) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

 

याप्रकरणी मृताचा लहान भाऊ अनिल वसंत भोंडवे (वय ३२) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या तो फरार आहे. काळखैरेवाडी येथील राजबाग परिसरात हे दोघेही भाऊ एकत्र राहत होते. मारुती भोंडवे यांच्यासह पत्नी सविता, मुलगा महेश आणि हर्षद बुधवारी रात्री घरात झोपले असताना रात्री साडेअकराच्या सुमारास अनिल त्यांच्या घराजवळ आला आणि मारुती भोंडवे यांना म्हणाला, तू वेगळा रहा, आमच्यात राहू नकोस, यानंतर त्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या, घराच्यादाराची कडी बाहेरुन लावली. त्याने मारुती यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने खिडकीतून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

Protected Content