मोरेना (वृत्तसंस्था) दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीने आईच्या निधनानंतर नातेवाईकांसह १५०० लोकांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला. परंतू या कार्यक्रमानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडालीय.
दुबईत वेटर म्हणून काम करत असलेला हा व्यक्ती मोरेनामध्ये १७ मार्चला आला होता. त्यानंतर त्याने २० मार्चला जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये १५०० लोकांनी सहभाग घेतला. त्याच्यात २५ मार्चपासून कोरोनाची लक्षणे दिसून आली. गुरुवारी त्यांची चाचणी रिपोर्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाने सुरेशच्या जवळच्या नातेवाईकांची तपासणी केली असता २३ पैकी १० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.