एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याचा धक्कादायक घटना गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत विवाहितेचे नाव असून तर संशयित पती किरण महादू मराठे (वय-३५) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक असे की, हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह शहरातील गांधी पुरा भागात वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्प्त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आलार. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी डोक्यात मारली. यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.