रांची (वृत्तसंस्था) कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आईसह पाच मुलांचा समावेश आहे. केवळ १७ दिवसांच्या आत या कुटुंबातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
धनबादच्या कतरासमध्ये राहणाऱ्या चौधरी कुटुंबातील सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या कुटुंबात कोरोनामुळे पहिला मृत्यू ४ जुलैला झाला होता. या पाच मुलांच्या ९० वर्षीय आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर झारखंडच्या रिम्समध्ये दाखल असलेल्या चौधरी कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यू झाला. चौधरी कुटुंबातील सर्वात वृद्ध महिलेने कोरोनाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करत त्या २७ जूनला नातवाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या. दिल्लीवरुन परतल्यानंतर या वृद्धेची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.परंतू कुटुंबाने आयसीएमआरच्या निर्देशांचे पालन न करता सामान्य पद्धतीने अंत्यसंस्कार केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरत मुलांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एक-एक करत पाच मुलांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.