बीड (वृत्तसंस्था) शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलीसांनी ७ मुली आणि ५ अल्पवयीन मुलांची या आश्रमातून सुटका केली आहे.
मांजरसुंबा घाट चढून गेल्यावर एक श्रीकृष्णाचे महानुभव पंथाचे मंदिर आहे. या ठिकाणी काही मुलं-मुली आध्यत्मिक शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. देवस्थानावरील मुलीच्या तक्रारीमुळे ७ मुलींची सुटका झाली. या प्रकरणांमध्ये आता पोलीस तपासानंतर सत्य समोर येणार आहे. दरम्यान, एका १४ वर्षीय मुलीला १५ दिवसापुर्वी एका विवाहित भक्ताने तिला पळवून नेले होते. या प्रकरणात देवस्थानचा संबंध नाही, आम्ही शिक्षण देतो घडलेला प्रकार अनपेक्षित आहे. त्या संबधीत व्यक्तीवर कडक कारवाई करावी असे या देवस्थान सारंगधर महाराज यांनी सांगितले.