जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न करून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडीलांसह वास्तव्याला आहे. मुलगी ही अल्पवयीन आहे असे माहिती असतांना जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारा तरूणाने तिला २५ जुलै २०२२ रोजी दुचाकीवर बसवून पळवून नेले. तरूणाने त्याच्या बहिणीकडे नेवून तिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला पिडीत मुलीच्या आईचा विरोध होता. याचा राग मनात ठेवून पिडीत मुलीला मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच तिच्यावर जबरी अत्याचार करून तिला गर्भवती केले. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलगी ही माहेरी निघून आली. माहेरच्या मंडळींना सोबत घेत पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, नंनद, नंदोईभाई यांच्याविरोधात गुरूवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.