धक्कादायक : अडथळा दूर करण्यासाठी अपंग पतीचा विहिरीत ढकलून केला खून !

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील एका अपंग असलेल्या पतीला २ जून रोजी दुपारी १ वाजता शेतात नेऊन विहिरीत ढकलून खून केला होता. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीस आला आहे. हा खून पतीनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याचे तिने कबुली दिली आहे या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मयताचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, प्रकाश धोबी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश धोबी यांच्यासोबत वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश धोबी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली. नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती धोबी च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.

Protected Content