जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिल कॉलनी परिसरातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून धारदार सुरा पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड (वय-२४) रा. मच्छी बाजार, सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील रामदेव बाबा मंदीराच्या परिसरात संशयित आरोपी हा हातात लोखंडी धारदार सुरा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजता सापळा रचून सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड याला ताब्यात घेतले. सोनूसिंग याच्यावर पोलीस ठाण्यात यापुर्वी गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतांना सुप्रिम कॉलनीत येवून हातात सुरा घेवून दहशत माजवित होता. त्याच्याकडून पोलीसांनी लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.